Kodachadri Trek:

कोडाचाद्री पश्चिम घाटातील शिखरांपैकी एक आहे आणि शिमोगा जिल्ह्यातील सर्वात उंच की जिथून आपण शिखरापेक्षा खाली ढग अनुभवू शकतो. ढगांचा एक समुद्र आपण नेहमीच डोळ्यांनी इथून पाहू शकतो. या ट्रेकमध्ये संपूर्ण घनदाट जंगलापासून ते धबधब्यापर्यंत सर्व काही आहे. कोडाचाद्री हे एक अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक वाइल्ड आणि स्थानिक प्रजातींचे घर आहे.

असा मानलं जात कि इथला sunset हा बघण्यासारखा असतो. पण आम्ही मान्सून मध्ये गेल्या ममुळे आम्हाला तो अनुभवता आला नाही. संपूर्ण ट्रेक हा अंदाजे १४ किलोमीटर्स चा आहे(One Way). सकाळी ९ वाजता जरी ट्रेक ची सुरुवात केली तरी संध्याकाळ पर्यंत आपण आरामात शिखरापर्यंत पोहचू शकतो. पायथ्यापासून सुरु केल्यानंतर अर्ध्या रस्त्यावर एक buttur milk point मिळतो. इथे ताक खूप मस्त मिळत आणि एवढी ट्रेक करून झाल्यानंतर त्याची चव वेगळीच असते. ती सांगता येत नाही फक्त अनुभवता येते.

खाली येताना आपण जीप ने येऊ शकतो. ही जीप ride एखाद्या roller coaster पेक्षा काही कमी नसते .

Best Season

ही ट्रेक आपण कधीही करू शकतो. प्रत्येक season हा त्याचे स्वतःचे attraction घेऊन उभा असतो.

Advisory

मान्सून मध्ये रक्तपिपासू किंवा जांभळी (Leeches) हे त्रासदायक ठरू शकतात.

Distance

बंगलोर पासून जवळपास ४०० किलोमीएटर्स अंतरांवर कोडाचाद्री आहे.

Difficulty

मध्यम (always subjective)

Attractions

१. हिडलूमने फाल्स

२. आरासीनगुंडी फॉल्स

३. sarvajna peetha - असा मानलं जात कि इथे शंकराचार्य ध्यान (Meditation) करण्यासाठी यायचे.

Nearby Attractions

१. Nagara Fort: २५ किलोमीटर्स

२. जोगचा धबधबा: ९० किलोमीटर्स

३. शिमोगा: १११ किलोमीटर्स

४. आगुंबे: ८८ किलोमीटर्स

Region

Mookambika Wildlife Sanctuary

Instagram Stories

link.pgyogesh.com/insta-kodachadri

Photos

Credits: Aniket Gangakhedkar